मंगळवार, २६ मे, २०२०

"बाजारात नका मारू येरझारा, उगवण तपासणी करुन घरचेच सोयाबीन पेरा" सिल्लोड तालुका कृषी विभागाचा उपक्रम

गेवराई शेमी (ता. सिल्लोड) : येथील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे उगवण तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविताना कृषी सहायक सारिका पाटील.
औरंगाबाद ता. २६ : "बाजारात नका मारू येरझारा, उगवण तपासणी करा अन् घरचेच सोयाबीन पेरा" हे घोषवाक्याद्वारे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम तयारी पेरणीपुर्व बियाणे उगवण तपासणी प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
   कोरोनामुळे फिजिकल डिस्टसिंग पाळून तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शेमी (ता. सिल्लोड) येथे शुक्रवारी (ता. २२) कृषी सहायक सारिका पाटील यांनी शेतकरी छाया ताठे यांच्या शेतावर जाऊन पेरणीपूर्व तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. लॉकडाऊनच्या काळात गावात बैठका घेता येत नसल्यामुळे यंदाच्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारे सोयाबीन बियाणे खात्री करून घेण्यासाठी पद्धत गोणपाटाचे चौकोनी तुकडे करून तीन नमूने तयार करावे ते ओले करून त्यावर १०० दाणे मोजून ते दीड ते दोन सेमी अंतरावर १०-१० च्या रांगेत ठेवावे असे तीन नमुने तयार करावे व पाणी मारून वरून गोणपाट झाकून गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे व अधून मधून पाणी मारावे व सहा-सात दिवसानंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून १०० पैकी ७० दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर ते बाजारातील गुणवत्तेचे आहे असे समजावे व शिफारशीनुसार पेरणीसाठी वापरावे. पेरणी करताना बियाण्याला थायरम कार्बनडॅझीम किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकांची तसेच रायझोबियम, पिएसबी या जीवाणू संर्वधकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी १०० दाण्याचे तीन संच तयार करून काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन त्यात ते दाणे टाकावे. पाच ते सात मिनिटानंतर दाणे वेगळे काढून त्यामधील पूर्णत फुगलेले व बियानाच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करा व मोजून घ्यावे. फुगलेले बियाणे टरफलात पाणी गेल्यामुळे पेरणीसाठी अयोग्य आहे व सुरकुत्या पडलेले पेरणीयोग्य आहेत असे समजावे.

'उत्पादन वाढीसाठी पेरणी करतांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राचा वापर करावा' - तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी 

५ टिप्पण्या:

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख