मंगळवार, २६ मे, २०२०

राज्यात राष्ट्रपती राजवटीची आघाडीच्या नेत्यांना भीती? विविध नेत्यांच्या राज्यपाल भेटीने तर्कवितर्क

 
 
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल

मुंबई, ता. २६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांसह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
   एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना राज्यपालांना सोमवारी (ता. २५) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार नारायण राणे, मिलिंद नार्वेकर, किरीट सोमय्या या नेत्यांनी वेगवेगळी भेट घेतली. या नेत्यांच्या भेटी गाठीचा नेमका अर्थ काय याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तत्पुर्वी संजय राऊत यांनी राज्यपालांना कमरेत वाकून घातलेला नमस्कार हा राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अनेक भेटी झाल्या मात्र राज्यापाल भेटीनंतर सोमवारी रात्री ही भेट सुमारे दिड तास सुरु होती. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
  राष्ट्रपती राजवटीची भीती
  कोरोनाच्या वाढत्या आकड्याने राज्यात जी अस्वस्थता पसरली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त होत आहे. शांत असलेले भाजपचे नेते पडद्यामागून हालचाली करीत मध्यप्रदेश प्रमाणे राज्यात सुद्धा 'ऑपरेशन लोटस' राबवित असल्याची आघाडीच्या नेत्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना या नेत्यांचे फोन गेल्याची चर्चा आहे.  मात्र संजय राऊत यांनी सरकारला कोणताही धोका नाही चिंता नसावी असे ट्विट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख