मुंबई, ता. २७ : राज्यात सुरू असलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आघाडीच्या पक्षांची बैठक बोलावली आहे.
वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा वाढता आलेख व राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधीसह आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानंतर बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा