सोमवार, २५ मे, २०२०

अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना





औरंगाबाद, ता. २५ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पुढील उपचारासाठी कार्डियाक अम्ब्युलन्समधून सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता मुंबईला रवाना झाले. रविवारी (ता. २४) त्यांची आरोग्य विभागामार्फत कोरोनाची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले होते.

सुरुवातीला कुणालाच याची माहीती नव्हते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कोरोना दोन रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल दिला. त्यात एक ६१ वर्षीय व्यक्ती शहरातील शिवाजीनगर भागातील असून, खासगी दवाखाण्यात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही व्यक्ती कोण याबद्दल अंदाज बांधण्याची चर्चा सुरु झाली आणि ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. परीसर, राहण्याचे ठिकाण, वय याचा संदर्भ घेत अंदाज व्यक्त करीत एकमेकांना फोन सुरु झाले. समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले. काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे सुद्धा व्हॉट्सॲप, फेसबुकवर ‘साहेब, लवकर बरे व्हा..' असे संदेश धडकायला लागल्यानंतर विरोधकांनीही देखील आपल्या सदिच्छा व्यक्त केल्याने ती व्यक्ती कोण याची खात्री झाली. श्री. चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. नांदेडचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या बैठका घेणे तसेच जिल्हाभरात फिरुन आढावा घेण्याचे काम केले. त्यानंतर मुंबईला गेलेल्या श्री. चव्हाण यांनी या काळात मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीसह नवनिर्वाचित विधानपरिषद आमदारांच्या शपथ कार्यक्रमाला हजेरी लावली. आठवडाभरानंतर नांदेडला परत आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...

लोकप्रिय बातम्या व लेख