चक्रीवादळाचा आपल्या जिल्ह्यात काय होणार परिणाम
मुंबई, ता. ३ : 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असताना महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासुुन बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन जूनला दुपारी तयार झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाची निर्मिती झाली. सुरुवातीला कमी तीव्रतेने असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे.
'निसर्ग' चक्रीवादळ हे बुधवारी (ता. ०३) दुपारपर्यंत मुंबईलगत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून जमिनीवर प्रवेश करण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी सुमारे ११० ते १२० किलोमीटर या वेगात चक्राकार वारे वाहण्याची शक्यता आहे. या मध्ये मुंबईसह रायगड, ठाणे पालघर तर गोवा, गुजरात च्या काही भागाला याचा तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग वादळाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास मुबंईजवळून नाशिक जळगाव या भागातून जाणार असल्याचा अंदाज आहे.